Share

भारताविरुद्ध कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या ‘या’ खेळाडुंने ठोकले झंझावती शतक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये पोहोचले आहे.

यादरम्यान इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो ने टी-२० ब्लास्ट स्पर्धेत धमाकेदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. टी-२० ब्लास्टमध्ये यॉर्कशायर आणि वर्सेस्टरशायर या दोन संघात सामना सुरु होता. वर्सेस्टरशायर संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यॉर्कशायरचा सलामीवीर फलंदाज यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने हा निर्णय चुकीचा ठरवत केवळ ५१ चेंडुत झंझावती ११२ धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १० षटकार लगावले. मात्र यादरम्यान त्याचा गुडघा दुखावला आहे.

बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर यॉर्कशायरने ६ गडी गमावत २१६ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात वर्सेस्टरशायरचा संघ केवळ १२२ धावापर्यंत मजल मारु शकला. भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत जर इंग्लंडचा नियमीत यष्टीरक्षक बेन फोक्स दुखापतीतून सावरला नाही तर जॉनी बेअरस्टोचा संघात समावेश होऊ शकतो. जॉनी बेअरस्टो हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडुन खेळत असतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!