🕒 1 min read
लातूर : औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतली, त्यांनी अनेक कृषी विषयक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीत आमदार पवार यांनी कृषी मंत्र्यांकडे विविध मागण्या मांडल्या. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
आमदार पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणले, ‘केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंघ तोमर यांची भेट घेऊन मनरेगाअंतर्गत जुन्या विहिरींची कामे करण्यास परवानगी देण्यात यावी व खरीप २०२० हंगाम पीकविमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी या विषयात लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली.’
केंद्रीय कृषीमंत्री मा श्री @nstomar जी यांची भेट घेऊन मनरेगाअंतर्गत जुन्या विहिरींची कामे करण्यास परवानगी देण्यात यावी व खरीप २०२० हंगाम पीकविमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी या विषयात लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली. pic.twitter.com/Mfo3jLSpr0
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 27, 2021
दरम्यान, उस्मानाबाद – शिवली – औसा – लामजना – निलंगा या घोषित राष्ट्रीय महामार्गाला क्रमांक देऊन सदर रस्त्याचे काम करण्यात यावे. लातूर – उमरगा/लातूर – तुळजापूर रोडवरील अवजड वाहतूक औसा शहराबाहेर वळवण्यासाठी औसा शहरासाठी बायपास रोड निर्माण करण्यात यावा, औसा – लामजना – किल्लारी – उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्यांचे काम करण्यात यावे तसेच औसा मतदारसंघातील ११ वेगवेगळ्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
