🕒 1 min read
सिंधुदुर्ग : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
कोरोनाने नागरिकांचे आर्थिक चक्र बिघडले असतानाच पुरामुळे संसाराचा कणाच मोडून पडला आहे. अनेकांचा संसार, जनावरे वाहून गेली आहेत. यामुळे पुरग्रस्तांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत असून राज्य सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कारभावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.
केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 27, 2021
‘केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना,’ असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
