नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभेत मोदींना धूळ चारून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्ली येथे भेट घेतली आहे. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली होती. ‘आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती. हा आमचा सौजन्य दौरा होता. लोकसंख्येनुसार आम्हाल कमी लसी मिळाल्या आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी यावर लक्ष घालू असं उत्तर दिलं आहे.’, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सोमवरपासून पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतल्यानंतर हा ममतांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
दरम्यान ममता बॅनर्जी या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अँटी-बीजेपी फ्रंट तयार करण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकही करणार असल्याची माहिती सध्या आलात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
- शिवसेना-युवासेनेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम, पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन
- पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल
- ‘छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती’ ; फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी नाशिक मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

