मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध देशातील अधिकारी यांच्यापासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी भविष्यात राष्ट्राचे नेतृत्व कराव्यात अशा खास शुभेच्छा दिल्या.
मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. ट्विटरवर सक्रिय असलेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे ट्विट केलेले नसल्याचं समोर येत आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असून याआधी देखील दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना विसर पडल्याचे समोर आले होते. यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं.
राज ठाकरेंनी दिल्या फोनद्वारे शुभेच्छा –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला. यावर ते उत्तर देताना म्हणाले कि, ‘ मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदींनी दिल्या अशा शुभेच्छा –
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी साडे आठच्या सुमारास ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या काळात केवळ पाईपलाईन झाल्या; पाणीपुरवठा योजनेचे खरे श्रेय ठाकरे सरकारचेच- आ.अंबादास दानवे
- शिवसेना-युवासेनेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम, पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन
- पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल
- ‘छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती’ ; फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी नाशिक मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

