Share

कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हा संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा देशमुख यांनी घेतला. तसेच सांस्कृतीक कार्य मंत्री या नात्याने कोरोनाचे संकट संपल्यानंतर पुन्हा एकदा वेरुळ महोत्सवाचे योग्य नियोजन करणार असल्याचे आश्वासनही अमित देशमुख यांनी दिले आहे.

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, जितेंद्र देहाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष आणि प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा या वेळी देशमुख यांनी घेतला. तसेच त्या संदर्भातल्या अडचणी समजून घेतल्या. या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी देशमुख यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्याच्या सांस्कृतीक वैभवाची साक्ष देणारा वेरुळ महोत्सव गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्या नंतर आलेल्या कोरोनाने तर सर्वच सांस्कृतीक कार्यक्रम बंद पडले आहेत. मात्र, कोरोनाचे संकट संपल्यानंतर आपण पुन्हा वेरुळ महोत्सव घेण्याकडे लक्ष देणार असल्याचे या बैठकीत अमित देशमुख यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!