🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करत रात्री २४ ऑगस्ट रोजी त्यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री त्यांचा जामीन मंजूर केला. एकंदरीत कालच्या या घटनेवरून नितेश राणे यांनी रात्री एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना फिल्मी अंदाजात आव्हान दिले आहे.
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 24, 2021
नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी यांचा ‘राजनिती’ या चित्रपटामधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करत म्हणतात की, ‘आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,’ तर पुढे ‘करारा जवाब मिलेगा,’ असंही म्हंटले आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना थेट धमकी दिली आहे.
कालपासून नारायण राणेंविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच तक्रारींच्या अनुषंगाने नारायण राणेंवर कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काल रात्री त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
