Share

ओमायक्रोनच्या धर्तीवर औरंगाबादेत होणार जिनोम सिक्वेन्सींग लॅब; विद्यापीठ कि घाटी ते मात्र ठरेना..!

Published On: 

औरंगाबाद: ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत शहरात २ ओमायक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आल्याने प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. विदेशातून दररोज येणार्‍या नागरिकांची कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र आलेले प्रवासी ओमायक्रोन पॉझिटिव्ह आहेत की नाही हे तपासण्यासाठी लागणारी महत्त्वाची जिनोम सिक्वेन्सींग लॅब औरंगाबाद शहरात नसल्यामुळे हे अहवाल पुण्याला पाठवले जात आहे. आणि त्यांची प्रतिक्षा करण्यात मोठा वेळ वाया जात आहे. त्यामुळे शहरात ही लॅब होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंगची अद्ययावत लॅब असणे आवश्यक झाले आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ओमायक्रॉनच्या अहवालाची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि पुणे याठिकाणीच जिनोम सिक्वेन्सींग लॅब आहेत. या दोन्ही लॅबमध्ये महाराष्ट्रातील सर्व रुग्णांची तपासणी होत असल्याने अहवालासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु करण्याचे प्रयत्न जिल्हा आणि राज्य स्तरावरून सुरु आहेत. दरम्यान, अशी अद्ययावत लॅब विद्यापीठात किंवा घाटी रुग्णालयात सुरु केली जाईल यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. यात घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज ची प्रयोगशाळा. या दोन्हीपैकी एका केंद्रावर जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी सुविधा सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!