Share

स्केटिंग करताना पडल्यानंतर जेनेलियाने सांगितली ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’

Published On: 

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर नेहमीच अ;ॅक्टिव्ह असते. ती सोशल मिडीयावर स्वत:चे मजेदार व्हिडीयो आणि फोटो शेअर करत असते. तिचे व्हिडीओ प्रचंड गंमतीदार असतात आणि क्षण भरातच ते लोकप्रिय देखील ठरतात. असाच एक जेनेलिया स्केटिंग करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात ती स्केटिंग करताना पडते आणि पडल्यामुळे जेनेलियाच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसते. परंतु तरीही ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’ म्हणत, तिने फनी व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते की, मुलांसाठी प्रेरणा बनण्यासाठी आणि स्केटिंग शिकल्यानंतर इन्स्टावर त्याचे कूल व्हिडीओ शेअर करून मिरवण्यासाठी स्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला मात्र . अनेकदा उंच भरारी घेण्याआधी तुम्ही धडपडता, पडता. मी अपयशी ठरलीये, पण हिंमत अजून कायम आहे. मी पुन्हा प्रयत्न करेन आणि यश येत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहीन… आशा करते, पुन्हा पडणार नाही.’ असा निर्धार तिने यावेळी व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/CMKcClrjsyU/?utm_source=ig_web_copy_link

बऱ्याचदा जेनेलिया व रितेश यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होतात. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलिया या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमिताने त्यांच्या चाहत्या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्या देण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!