🕒 1 min read
इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे.
दरम्यान, भारतीय संघाने यावर्षाच्या सुरुवातीला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या गैरहजरीत देखील संघाने उत्तम कामगिरी केली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियातील या ऐतिहासिक विजयाने संघाला वेगळाच विश्वास दिला, असे विधान भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने केले आहे.
पुढे ईशांत म्हणाला, विराटच्या गैरहजरीत आणि प्रमुख खेळाडूंना दुखापत अशा परिस्थतीत देखील आम्ही ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी केली आणि विजय मिळवला त्यामुळे आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत, कितीही दडपण असताना दमदार पुनरागमन करू शकतो, हे आम्हाला कळले. मी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाचा भाग नव्हतो. परंतु, त्या विजयाने भारतीय संघाला एक वेगळाच विश्वास दिला. आमचा आत्मविश्वास खूप वाढला, असेही ईशांत म्हणाला. तसेच भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचेही त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
