Share

आयसीसीच्या त्या नियमावर गावसकरांनी दर्शवली नाराजी, म्हणाले

Published On: 

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

अखेरच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. जर हा सामना अनिर्णीत झाला तर विजेतेपद दोन्ही संघाना विभागुन देण्यात येईल. तसेच विजयाची रक्कमही दोन्ही संघाना समान विभागुन देण्यात येणार आहे. आयसीसीच्या या नियमावर भारताचे माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी नाराजी दर्शवली आहे. त्यांच्या मते फुटबॉल मध्ये सामना अनिर्णीत झाला तर पेनल्टी शुटआउटच्या आधारे विजेता ठरवला जातो. याप्रकारे आयसीसीने सामना अनिर्णीत झाला तर असाच काही उपाय शोधायला हवा असे ते म्हणाले.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात २१७ धावांची मजल मारली होती. प्रत्त्युत्तरात न्युझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. यानंतर भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावुन ६४ धावांची मजल मारली होती. या सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या दिवसी पावसामुळे एकही चेंडु न खेळता खेळ रद्द करण्यात आला होता. तर ज्या तिन दिवसात खेळ झाला त्यातील दोन दिवसात अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ अर्ध्यातच थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!