🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. तर, काही भाजपा नेत्यांकडून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येईल, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काँग्रेसच्या नंबर एक होण्याच्या महत्त्वाकांक्षेचं त्यांनी समर्थन केलं. ‘काँग्रेस राज्यात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. एक नंबरवर जाण्याची इच्छा ठेवली तर त्यात वावगं काय? आणि आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळतं असं सूत्र आहे,’ असं चव्हाण म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, ‘भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. भाजपने राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचे उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. तसेच, शिवसेना-काँग्रेसच्या विचारभिन्नतेबाबतही त्यांनी भाष्य केले. ‘तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण, हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही’, असे उत्तर चव्हाण यांनी दिलंय. एका इंग्रजी दैनिकात त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेय.
महत्त्वाच्या बातम्या
- आता महाराष्ट्राचाही विक्रम; आज तब्बल ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली१
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
