Share

‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता’ ; वॉनने पुन्हा एकदा उडवली टीम इंडियाची खिल्ली

Published On: 

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.

साउथम्पटनमध्ये ५ व्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा सामन्याच्या सुरुवातीला विलंब झाला. सामना सुरु होण्यात उशीर होत असल्यामुळे सोशल मीडियावर यूजर्सने बॅटिंग केली आणि पाऊस व संघांशी संबंधित मिम्स व प्रतिक्रिया शेअर केल्या. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनीही ट्विट करत टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे. “ही वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप उत्तर दिशेला खेळली गेली असती तर एक मिनिटांचा खेळही चुकला नसता!! न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता,” असं ट्विट वॉन यांनी केलं आहे.

हा सामना सुरु होण्याअगोदर देखील मायकल वॉनने भारतीय संघाला ट्रोल केले होते. पाऊसामुळे पहिला दिवस वाया गेल्यानंतर हवामानामुळे भारतीय संघ वाचला असे ट्विट केले होते. पुन्हा एकदा वॉनने असेच ट्विट करत टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!