🕒 1 min read
मुंबई : गेल्या महिन्यात १७ मे रोजी मुंबई शहरात कर्करोगग्रस्तांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या.
कर्करोगग्रस्तांच्या उपचारासाठी परळच्या टाटा रुग्णालयात महाराष्ट्राच नव्हे, तर देशभरातून रुग्ण येत असतात. त्यांच्यासोबतच नातेवाईक, काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईत नसल्यामुळे त्यांची परवड होते. खासगी जागा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे बरेचदा नातेवाईकांना फूटपाथवर राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारच्या म्हाडा उपक्रमाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी दिली होती.
पण आता आव्हाड यांच्या या ड्रिम प्रोजेक्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धक्का दिला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
