औरंगाबाद : फर्स्ट या संस्थेच्या पुढाकाराने कैलासनगर स्मशानभूमीतील गॅसदाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या दाहिणीची महापालिकेमार्फत लवकर चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तिचा वापर सुरू होईल. कोरोनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू वाढले होते. त्यातच स्मशानभूमींमध्ये अंतिम संस्कारासाठी रांगा लागत होत्या. शहरातील प्रमुख पाच स्मशानभूमींमध्ये गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. विद्युत दाहिनी बसवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कैलास नगर स्मशानभूमीतील काम आता पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या लाटेत शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. बाहेरचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान रुग्ण गंभीर झाल्यावर त्याचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले होते. आणि मृत्यू झालेल्या रुग्णांवर शहरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागत असल्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ताटकळत थांबावे लागत होते.
त्यामुळे महापालिकेचे प्रशासक आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी कैलास स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्यासाठी उद्योजक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या संस्थेने उभारण्यासाठी मनपाशी सामंजस्य करार केला असून अवघ्या दोन महिन्यांमध्ये गॅसदाहिनी उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. दुरुस्तीचे काम देखील संस्थेमार्फत केले जाणार आहे. काम पूर्ण झाल्याचे महापालिकेला कळवण्यात आले आहे. आता महापालिकेकडून चाचणी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर प्रत्यक्षात तिचा वापर सुरू करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- औरंगाबादेत ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी १० कोटी ८० लाखांचे पॅकेज, मुलभूत समस्या आतातरी सुटणार का?
- मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून फाडले, खासदार शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- आयटीआयसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

