Share

औरंगाबादेतील रस्त्यावर कचराच कचरा; संतप्त आयुक्तांनी रेड्डी कंपनीला बजावला १० हजारांचा दंड..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: शहरातील अनेक भागांमध्ये कचरा आढळून आल्याने तसेच कचरा उचलण्यात अनियमितता, दिरंगाई, बेजबाबदारपणा दिसून आल्याने कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या रेड्डी कंपनीला महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी १० हजार रुपये दंड लावला आहे. तसेच स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी बुधवारी दिले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी शहरातील सिडको, रेल्वेस्टेशन, शहानुर मिया दर्गा रोड, कालिका माता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल गार्डन, विजयनगर आदी भागांची पाहणी केली. दरम्यान रेल्वेस्टेशन समोरील हटविण्यात आलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाची पाहणी करून रस्त्याची सीमा व्यवस्थित करण्याची सूचना प्रशासकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विजयनगर भागातील कालिका माता मंदिराच्या बाजूला असलेल्या महानगरपालिकेच्या जागेची पाहणी करण्यासाठी जात असताना शहानुर मिया दर्गा रोडवरील कृषी विभागाच्या रस्त्याच्या कडेला कचरा आढळून आल्याने हा कचरा तातडीने उचलण्याचे आदेश संबंधित स्वच्छता निरीक्षकास दिले.

यानंतर कालिकामाता मंदिराच्या बाजूला महानगरपालिकेच्या जागेची पाहणी केली. या जागेच्या आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपातून, नाल्यातून वाट काढत चहुबाजूने प्रशासकांनी पाहणी केली. या जागेच्या बाजूला राहत असलेले नागरिकांनी तेथे कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी रेड्डी कंपनीला १० हजार रुपयांचा दंड व स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच वाॅर्ड अधिकाऱ्यास समज देऊन यापुढे आपल्या परिसरात कुठे कचरा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासकांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!