🕒 1 min read
नवी दिल्ली : आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी कलाकारांच्या घरी आगमन होणाऱ्या गणपतीची देखील विशेष चर्चा असते.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच कठोर निर्बंध या काळात देखील लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही.
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2021
याच पार्श्वभूमीवर, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मराठीत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया! असं ट्विट करत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

