Share

माहूरच्या जंगलातील आग अजूनही आटोक्यात नाही; वन विभागाचे दुलर्क्ष !

Published On: 

नादेंड: माहूरच्या जंगलाला आग लागली असून अजूनही आग आटोक्यात आली नसल्यामुळे असे म्हणता येईल कोणे एकेकाळी माहूर तालुका वन व्याप्त होता, माहूरमध्ये घनदाट जंगले होती, असे म्हणण्याची वेळ लवकरच माहूर जनतेवर येणार असल्याची चिन्हे दिसु लागली आहेत. ही आग १९ एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा दत्त गडावरील जंगलात मोठी आग लागली होती, नगर पंचायतच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ती आग आटोक्यात आणल्याने छोट्या व्यवसायिकांची दुकाने आगीतून वाचली अन्यथा सर्व दुकाने जळुन खाक झाली असती.

या जंगलाला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या भागाला निसर्ग संपन्नतेचा वारसा मिळाला आहे. हिरव्या डोंगररांगावरील दाट वृक्षांमुळे व मोठ्या झाडांमुळे या भागात विविध वनचरांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. हरीण, अस्वल, कोल्हे, लांडगे, बिबटे, तरस असे वेगवेगळ्या प्राण्यांचे या जंगलात दर्शन होत असते. जंगलात लागणाऱ्या आगी मुळे जंगलांतील प्राणी धोक्यात आले आहेत. या जंगलात जागोजाग वणवे पेटत असल्यामुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.

सतत लागणाऱ्या या आगीमुळे माहूरचे जंगल नामशेष होण्याचे चिन्ह दिसत आहेत. आग आटोक्यात न आल्यास पुढे केवळ पुस्तकावरच या विषय माहिती राहील, असे वनप्रेमींचे म्हणने आहे. सोमवारी सायंकाळी दत्त मंदिराजवळ लागलेली आग नगरपंचायत अग्निशामक दलाचे कर्मचारी गणेश जाधव,अविनाश रूणवाल, जोतिबा खडसे, प्रवीण शेंडे यांनी तीन तास प्रयत्न करुन आटोक्यात आणली असली तरी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी फिरकलेच नाहीत तर ही आग कशी आटोक्यात येईल, असा प्रश्न माहुरवासियांना तसेच वनप्रेमींना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!