औरंंगाबाद : वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या १३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.२०) जेरबंद केले.
दिनेश माणिकचंद राजपूत (वय ४०, रा.आम्रपाली बौध्द विहाराजवळ, एमआयडीसी वाळूज परिसर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. वाळूज पोलिस ठाण्यात २००७ साली गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला दिनेश राजपूत हा एमआयडीसी वाळूज परिसरात आला असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.
गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार किरण गावंडे, संजयसिंह राजपुत, बबन इप्पर, पंढरीनाथ जायभाये, सचिन घुगे, तातेराव शिंगारे आदींच्या पथकाने दिनेश राजपूत याला सापळा रचून जेरबंद केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती


