नाशिक : नाशिकमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात आधीच ऑक्सिजनची कमतरता, बेडची उपलब्धता नसणे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही अशा समस्यांचा सामना रुग्ण आणि त्यांचे नातेवाई करत आहेत. त्यात या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्यातील सर्चच रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाची तपासणी करणार असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा ढीसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला. या घटनेतून बोध घेत राज्य शासनाने सर्वच रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्र्यांनी रुग्णालयात जावून ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी केली. त्या नंतर हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
#नाशिक च्या #ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करणार ;
ऑक्सिजन गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात
: कृषीमंत्री दादाजी भुसे@dadajibhuse @my_nmc @InfoDivNashik #Nashik #OxygenLeakage pic.twitter.com/5ZZuwSM4yq— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) April 21, 2021
राज्यात आधीच ऑक्सिजन बेड्स मिळत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त होते. त्यात ही घटना घडली आहे. या घटनेतील मृत नातेवाईकांना आर्थिक मदत देखील शासनाने जाहीर केली आहे. मात्र, आर्थिक मदत घरच्या व्यक्तीची कमतरता पूर्ण करू शकत नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सक्षम निर्णयांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद मनपाचा पर्यावरणपूरक उपक्रम! अंतिम संस्कारात आता लाकडांच्या वापरास बंदी
- महिना संपत आला तरीही पेन्शनर्स पेन्शनपासून वंचित, नेहमीच्याच विलंबामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल
- अखेर सनराईझर्स हैद्राबादला सूर गवसला; पंजाब किंग्सला नमवत मिळवला विजय !
- भाजपाचे कार्यकर्ते राज्यात नव्या जोमाने व्यापक सेवाकार्य करतील; चंद्रकांत पाटलांची घोषणा
- औरंगाबाद मनपाचा पर्यावरणपूरक उपक्रम! अंतिम संस्कारात आता लाकडांच्या वापरास बंदी


