Share

तर घाटीतील परिचारिका करणार कामबंद आंदोलन!

Published On: 

औरंगाबाद : दररोज वाढणारी रुग्णसंख्या पाहता घाटी रुग्णालयाने आता नवीन वॉर्ड सुरु करण्याचा विचार केला आहे. कोरोना रुग्णांसाठी नवीन कक्ष आणि खाटा वाढविण्यात येत आहेत. परंतु आवश्यक परिचारिका आणि कर्मचारी भरले गेलेले नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे २६ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेने दिला आहे.

घाटीत कोरोना आणि इतर नियमित रुग्ण दाखल होत आहेत. दररोज वाढणारे रुग्णांची संख्या आणि होणारे मृत्यू यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण आहे. याही परिस्थितीत कर्मचारी काम करत आहे. आता कोरोना रुग्णांसाठी नवीन कक्ष उघडण्यात येत आहे. बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे परिचारिकांवर कामाचा भार वाढला आहे. त्यातून रुग्णसेवा देताना परिचारिका कोरोनाने बाधित होत आहेत. नवीन कक्ष उघडण्यास, खाटा वाढविण्यास आमचा विरोध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परंतु त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ वाढवावे, ही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाला वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिचारिका आता २६ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!