मुंबई: आयपीएलच्या १५ व्या हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी आरसीबी संघ काही मोठ्या बदलांसह दिसणार आहे. संघात सर्वात मोठा बदल विराट कोहलीच्या रूपाने झाला आहे. यावेळी त्याच्या जागी फाफ डू प्लेसिस संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. गेल्या वर्षी विराटने शेवटच्या वेळी कर्णधार म्हणून आरसीबीचे नेतृत्व केले. आता इरफान पठाणने विराटच्या नेतृत्वावर वक्तव्य केले आहे.
विराट कोहली (virat kohli) गेल्या अनेक महिन्यांपासून सतत खराब कामगिरीचा सामना करत आहे. पण, इरफान पठाणला (irfan pathan) खात्री आहे की तो यावेळी आयपीएलमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल. “तुम्ही किमान १४ सामने खेळता आणि ते कोणत्याही क्रिकेटरसाठी पुरेसे असते. पण, कोहलीसारख्या खेळाडूसाठी जो जबरदस्त आहे आणि आधुनिक युगाचा एक दिग्गज आहे. तो प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करेल. कर्णधारपदाप्रमाणे विराटवर कोणतेही दडपण नाही, तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्हाला निकाल दिसतो. जसे चला इतर संघांची रणनीती आणि प्लेइंग इलेव्हन पाहू पण, यावेळी त्याच्याकडे तशी जबाबदारी नाही. मला वाटतं त्याला ते आवडेल.”
२०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा विराटकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. तेव्हापासून २०२१ पर्यंत त्याने या संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने आरसीबीसाठी १४० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाला दोनदा अंतिम फेरी गाठण्यात यश आले. पण, विजेतेपद कधीच मिळाले नाही. यामुळे विराटने नेतृत्व सोडत खेळाडू म्हणून कामगिरीकडे लक्ष देण्याचे ठरवले.
महत्वाच्या बातम्या
- “सलमान खानसारखं बनू नकोस..” ‘विकी कौशल’ होतोय ट्रोल!
- “निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”, राष्ट्रवादीची टीका
- एक शेर तर दुसरा सव्वाशेर..! बेबी एबी आणि पोलार्डची बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी; पाहा VIDEO
- IPL 2022: आरसीबीच्या संघात ‘हा’ अंडर १९ स्टार करतोय नेट बॉलिंग; वर्ल्डकपमध्ये केली होती अप्रतिम कामगिरी
- राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

