🕒 1 min read
मुंबई: शिवसेना पक्ष आज अडचणीत सापडला आहे. सेनेच्या अंतर्गत बंडामुळे महाविकास आघाडी सरकार डगमगताना दिसून येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेशीच बंड करत आसामधील एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. एकूण ४० आमदारांसह सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ते ठाम आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या आमदारांची संख्या वाढणार असल्याचे संकेतही शिंदे यांनी दिले आहेत. यावरूनच मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajajan Kale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
शेवटी आपण दोघेच तर राहणार नाही ना …?
PC – @mnsreport9 pic.twitter.com/41Qm9iaqxk— Gajanan Kale (@MeGajananKale) June 21, 2022
डोक्याला हाथ लावताना उद्धव ठाकरे आणि बाजूला आदित्य ठाकरे बसले असतानाचा फोटो पोस्ट करत “शेवटी आपण दोघेच तर राहणार नाही ना…?”, असे खोचक ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे. दरम्यान राजकारणात कधीही सत्ता परिवर्तन होऊ शकते अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.
त्यातच शिवसेनेशी बंड पुकारणाऱ्या आमदारांना आता सेनेने पत्र पाठवले आहे. बुधवार २२ जूनरोजी वर्षा बंगल्यावर सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल. असे शिवसेनेने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Cabinet Meeting : महाविकास आघाडी सावध! मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- Nitin Sardesai : “नेहमीच नॉट रिचेबल राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना…”, नितीन सरदेसाई यांचा खोचक टोला
- Sanjay Raut: …मग बघू कोणाकडे किती लोक आहेत – संजय राऊत
- Eknath Shinde : नितीन देशमुखांना मारहाण केल्याच्या राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंच स्पष्टीकरण
- Eknath shinde : “गटनेतेपदावरून मला काढता येत नाही” ; एकनाथ शिंदेचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
