मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या आमदारांची संख्या वाढणार असल्याचे संकेतही शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपसोबत शिंदे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान येत आहे. यावरूनच मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेहमीच 'Not Reachable' असणार्या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता 'Not Reachable'…
गुरूची विद्या गुरूला ?@mnsadhikrut @abpmajhatv @News18lokmat @TV9Marathi @zee24taasnews @saamTVnews
— Nitin Sardesai (@1nitinsardesai) June 21, 2022
“नेहमीच नॉट रिचेबल असणार्या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता नॉट रिचेबल…. गुरूची विद्या गुरूला?”, असे ट्वीट नितीन सरदेसाई यांनी केले आहे. दरम्यान शिवसेनेशी बंड पुकारणाऱ्या आमदारांना आता सेनेने पत्र पाठवले आहे. बुधवार २२ जूनरोजी वर्षा बंगल्यावर सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल. असे शिवसेनेने म्हटले आहे.
सोबतच उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे. आता या बैठकीला किती आमदार हजेरी लावतात याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : नितीन देशमुखांना मारहाण केल्याच्या राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंच स्पष्टीकरण
- Eknath shinde : “गटनेतेपदावरून मला काढता येत नाही” ; एकनाथ शिंदेचा दावा
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे माझे जिवाभावाचे मित्र – संजय राऊत
- Bacchu Kadu: “निधीवाटपाबाबत नाराजीतून एकनाथ शिंदेंसोबत” ; बच्चू कडू यांच स्पष्टीकरण
- Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे सरकार बरखास्तीची शिफारस देणार ?


