🕒 1 min read
बीड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वांच्या मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा केली आहे. रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांसाठी नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली आहे. गडकरींनी महाराष्ट्रातील रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी तब्बल २७८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
यामध्ये केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचा आणि परळी – गंगाखेड मार्गाचा समावेश आहे.
मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक निधी देण्याची मागणी केली होती. गडकरींनी माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ते विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते, आज त्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. याची माहिती बीड च्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी सोशल मिडिया वर दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले कि, बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी तर केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत जिल्ह्यातील सात रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आला आहे. पंकजा मुंडे यांनी परळी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग ३६१ – एफ या मार्गाच्या विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यांनी केलेल्या मागणीमुळे या रस्त्यासाठी २२४ कोटींचा निधी मिळाला आहे. ताईसाहेबांनी केलेल्या मागणीला यश आले. असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या मूलमंत्राला अनुसरून काम करत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी दिल्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे सोबतच यामाध्यमातून आपण प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
तसेच डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांचे मनःपूर्वक आभार, सुद्धा मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मतदानादिवशी मोदी बंगालमध्ये रॅली कसे काय करू शकतात ? बॅनर्जींचा निवडणूक आयोगाला सवाल
- ‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’
- महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा
- सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
- #HSC : बारावीच्या हॉल तिकिटाबाबत महत्वाची बातमी; जाणून घ्या कसे मिळवाल हॉल तिकीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
