Share

बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे, परंतु…- अनिल परब

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित के लेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाली आहे.याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. परंतु, भाजपचे कार्यकर्ते यांना अडवत आहे, असा आरोप केला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना परब म्हणाले की,’बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णयही आम्ही घेतलाय. इतर कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करु नये. याबाबत पोलिस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे.’तसेच भाजप कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याचं काम करत आहेत. कामगारांनो तोल जाऊ देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नका. जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवरही असेल. राजकीय आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कालही आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली होती. आजही चर्चेला तयार आहोत. काल सदाभाऊ खोत यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. पण त्यांनी बाहेर जाऊन वेगळंच काही तरी सांगितलं. आजही त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो. उद्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करूया म्हणाले. माझी आजही चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षनेत्यांसोबतही चर्चेची तयारी आहे. माझी चर्चेची दारं खुली आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. पण हा प्रश्न जेवढा चिघळेल तेवढं एसटीचं नुकसान होईल. तुमचंही नुकसान होईल. अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या एसटीचं आणखी नुकसान होऊ देऊ नका. आपण त्यातून मार्ग काढूया.’

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!