Share

‘जय श्रीराम’वरून समाजात तेढ; अखिलेश यादव यांचा फरार कार्यकर्ता उम्मेद इदरीसी अटकेत

Published On: 

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजधानी दिल्लीत शनिवारी मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. बळजबरीने ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडणे, त्याची दाढी कापणे व मारहाण केल्याची जाहीर वाच्यता करणारा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात शेअर केल्याचा आरोप या कार्यकर्त्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक लोनी बॉर्डर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी उम्मेद पहलवान इदरीसी फरार होता. अखेर जिल्हा पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला दिल्लीत बेड्या ठोकल्या. अब्दुल शमद सैफी या ७२ वर्षीय वृद्धाचा ‘अनावश्यक’ व्हिडिओ इदरीसीने बनविला होता. समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा यामागे मुख्य हेतू होता. यात सैफी यांनी जातीयवादाचे आरोप केले होते. एवढेच नव्हे तर इदरीसीने स्वत:च्या फेसबुक पेजवरून तो व्हिडिओ शेअर केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी भादंविच्या कलम १५३ (अ), २९५ (अ) ५०४ आणि ५०५ नुसार गुन्हा नोंदविल्यानंतर पहलवान इदरीसीला बेड्या ठोकल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी उम्मेद पहलवान इदरीसी हा समाजवादी पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतचे त्याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. तत्पूर्वी ४ जून रोजी काही तरुणांनी अपहरण करून आपणास बंधक बनविले व मारहाण केली, असा आरोप बुलंद शहरचे रहिवासी अब्दुल शमद सैफी यांनी केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे नोंद झाले असून, ९ जणांना अटक झाली आहे. त्यापैकी ८ जणांची जामिनावर सुटका झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!