राळेगणसिद्धी : माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आहे. शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खोत यांनी आज रविवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता सुमारे अर्धातास चर्चा केली.
यावेळी त्यांनी आण्णा हजारे यांची भेट घेतली व तब्बेतीची विचारपुस केली. केंद्र सरकारचे कृषी विधेयक, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण, शेतकऱ्यांचे राज्यातील विविध प्रश्न, सहकारी कारखाने इत्यादी विषयी चर्चा झाली. आण्णांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळी द्वारे राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे.
स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर आण्णांनी जन आंदोलनाच्या माध्यमातुन माहितीच्या अधिकार सर्व सामान्यांना मिळवुन दिला. या पार्श्वभूमीवर खोत यांनी आण्णांची भेट घेतली. हजारे यांनी राज्य सरकारकडे शेतक-यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला तर शेतक-यांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो, असे माजी मंत्री खोत म्हणाले. पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र व विदर्भाचा दौरा करून शेतक-यांच्या प्रश्नांवर जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, अजित पवारांचे आदेश
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘बापाच्या कुशीत चिमुकली आर्ची’ ; ‘फादर्स डे’ निमित्त रिंकुची पोस्ट बनली चर्चेचा विषय
- ‘साहेब भाजपशी जुळवून घ्याच,’ सरनाईकांच ठाकरेंना पत्र; चंद्रकांतदादा म्हणाले, ‘आमचे नेते…
- प्रताप सरनाईकांनी भाजपलाच डिवचलंय, पत्र नीट वाचा – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

