राळेगणसिद्धी : माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आहे. शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खोत यांनी आज रविवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता सुमारे अर्धातास चर्चा केली.
यावेळी त्यांनी आण्णा हजारे यांची भेट घेतली व तब्बेतीची विचारपुस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. दूध दरवाढ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते यावेळी बोलले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, अशी खोचक टीकाही खोत यांनी केली आहे.
तसंच दूध दरवाढीचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे. त्यावर कायमस्वरुपी मार्ग निघायला हवा. राज्यात रोज 2 कोटी लीटर दूध संकलन होतं. त्यातले 30 टक्के सहकारी संस्था तर 20 टक्के दूध खासदार कंपन्या खरेदी करतात. मात्र, आता खासगी कंपन्यांचं मोठं रॅकेट तयार झालं आहे. हे रॅकेट सत्ताधारी लोकांचेच आहे. त्यामुळे काही काळ दर वाढवायचा तर पुन्हा कमी करायचा, असा प्रकार सुरु असल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.
तर युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे आता घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. हे सरकार कोरोनाचं भूत घेऊन सर्वत्र हिंडत आहे. कोरोना संकटाने अडचणीत असलेल्या शेतक-यांना पीक कर्ज, खते, बि – बियाणे मिळत नाहीत. मोर्चे, उपोषणे कोणी करू नका असे सांगणा-या राज्य सरकारलाच ख-या अर्थाने कोरोना झालाय अशी घणाघाती टिका त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरनाईकांच्या पत्रावरून सरकारच्या परिस्थितीचा अंदाज येतो’, पंकजा मुंडेंची खोचक टीका
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य


