मुंबई : सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा कॉंग्रेस सातत्याने स्वबलाचा नारा देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. यावेळी बोलताना कॉंग्रेसचा हाच धागा पकडून बोलताना ठाकरे म्हणाले कि, ‘अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे, स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवेच. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं, तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा.. माझ्यासाठी स्वबळ हे आहे.’ असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले आहे.
यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. ‘शिवसेना कायम प्रत्येक लढाई स्वबळावर लढत असते. युतीत असो महाआघाडीत असो, तो राजकीय विषय असतो. निवडणुका हा राजकीय विषय असतो. पण प्रत्येक लढाई आम्ही कायम आमच्या ताकदीवर लढत आलो आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यामुळे कुणाच्याही मनात भ्रम राहता कामा नये. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात एक नेता स्वबळाची भाषा करतो. दुसरा म्हणतो ही पक्षाची भूमिका नाही. त्यामुळे त्या सर्वांनी या गोंधळातून बाहेर आलं पाहिजे. मग स्वबळ वगैरे काय आहे त्या संदर्भात निर्णय घेऊ,’ असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ‘स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे, केवळ निवडणुका नाही, न्याय हक्कासाठी हा नारा आहे, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी वापरलं जाणारं ते स्वबळ आहे.’ असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक


