नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करताना शहीद झालेल्या हवाई दल, दिल्ली पोलीस व नागरी सुरक्षेच्या ६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार देशाची सेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे. त्यानुसार आप सरकारने नागरी सुरक्षेच्या १, हवाई दलाच्या ३ व दिल्ली पोलिसांच्या २ शहीद जवानांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा निर्णय शनिवारी एका बैठकीत घेण्यात आला,’ अशी माहिती मनीष सिसोदिया यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
‘जवानांचे शहीद होणे एक न भरून येणारे नुकसान असते. त्यामुळे आप सरकारने सत्तेत आल्यानंतर लगेचच अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती. यातील अनेक कुटुंब सध्या पेन्शनवर जगत आहेत. या योजनेमुळे त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत होईल,’ असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सदाभाऊ खोत यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट ; केली ‘या’ विषयावर चर्चा
- ‘ठाकरे सरकारला कोरोनाची लागण ; हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही’
- ‘स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा’ ; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
- …म्हणून प्रताप सरनाईकांनी ते पत्र लिहिलं असेल; संजय राऊतांचा दावा
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

