Share

राफेल विमाने २०२२ पर्यंत हवाई दलात, हवाईदल प्रमुखांची माहिती

Published On: 

हैदराबाद : फ्रान्सकडून खरेदी करण्यात येणारी ३६ राफेल लढाऊ विमाने २०२२ पर्यंत हवाई दलात समाविष्ट करण्याची योजना असल्याची माहिती हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी दिली. ‘राफेलला हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याची आमची योजना अत्यंत स्पष्ट आहे’, असे ते म्हणालेत.

‘आमचे लक्ष २०२२ आहे. हे एकदम निश्चित आहे. मी यापूर्वीही त्याचा उल्लेख केला आहे. एक किंवा दोन विमाने वगळता कोविड संबंधी कारणांमुळे थोडा विलंब होऊ शकतो. पण काही विमाने वेळेपूर्वीच येत आहेत. त्यामुळे राफेलचा समावेश करण्याच्या योजनेवर हवाई दलाचे लक्ष एकदम निश्चित आहे. संचलनाच्या आघाडीवरही दल पूर्णत: तयार आहे. त्यामुळे सर्वकाही पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होईल यात कोणतीही शंका नाही’, असे भदौरिया यांनी सांगितले. त्यांनी डुंडीगल येथे हवाई दल अकादमीच्या ‘कम्बाइंड ग्रॅज्युएशन परेड’चे निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

शेजारी राष्ट्रांमुळे सुरक्षेचे आव्हान
भारताने २०१६ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. हा सुमारे ५९ हजार कोटींचा सौदा आहे. हवाई दल परिवर्तनाच्या मोठ्या प्रक्रियेतून जात असल्याचेही भदौरिया यावेळी म्हणाले. ‘हवाई दल परिवर्तनाच्या एका महत्त्वपूर्ण कालखंडातून मार्गक्रमण करत आहे. आमच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूत तंत्रज्ञान व लढाऊ शक्तीचा अत्यंत वेगाने समावेश होत आहे. यामागे मुख्यत: आपले शेजारी व अन्य क्षेत्रांतील वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेसह आपल्यापुढील अभूतपूर्व व वेगाने बदलणाऱ्या सुरक्षा आव्हानांचे कारण आहे’, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!