Share

औरंगाबादेतील मटका अड्डे उद्ध्वस्त, पोलिसांची धाडसी कारवाई

Published On: 

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या दोन जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई करीत जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी चार जुगा-यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. जुगार अड्यावर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने अवैधरित्या जुगार अड्डा चालविणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगावात असलेल्या पवननगर येथे कल्याण मटका नावाचा जुगार मोबाईलच्या व्हॉटसअपवर खेळविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारून कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या नितेश मनोहर टेबुरने (वय ३०, रा. पवननगर ) आणि कचरू श्रीराम आहेर (वय ४२, रा. श्रीराम अयोध्या नगर, रांजणगाव) या दोघांना एमआयडीसी वाळुज पोलिसांनी रांजणगाव मच्छी मार्केट येथून अटक केली. निलेश टेंबुरने हा त्यांच्या मोबाईलवरून पावत्याचे स्क्रीन शॉट सचिन ठाकुर आणि अमृत वलडारा याच्या मोबाईलवरील व्हॉटस अप क्रमांकावर पाठवित होता. पोलिसांनी जुगा-यांच्या ताब्यातून ११ हजार ९९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंपा चौक परिसरातील जुलेखा हॉस्पीटल समोर काही जण टाईम बाजार मटका जुगार खेळत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेंश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक सरवर शेख यांच्या पथकाने छापा मारून मोहम्मद खान गौस खान (वय ३७, रा. चंपा चौक) आणि सय्यद मोईन नजीर (वय ३०, रा. किराडपूरा) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १ हजार ९५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!