Share

नांदेड जिल्ह्यातील एसटी बंद, इतर जिल्हे आणि राज्यातील प्रवासी वाहतूक सुरु

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना पादुर्भावामुळे संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात एसटी बंद राहणार असून इतर जिल्हे व राज्यात प्रवासी वाहतूक सुरु राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून अकरा दिवसीय संचारबंदी लागू केल्यामुळे जिल्ह्यात कुठेही बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना उतरता येणार नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील नांदेड, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली व माहूर या एसटी आगारातून वाहतूक करताना फक्त इतर विभागातील, इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवाशांचीच वाहतूक करावी. जिल्ह्यांतर्गत प्रवाशांची चढ उतार करता कामा नये. एसटी चालक व वाहकांनीही याबाबत सतर्कतेने काम करावे.

विभागीय कार्यालयाच्या सूचनेशिवाय नवीन फेऱ्या सुरु करु नयेत. आपल्या आगारात चालविण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनानुसारच चालक व वाहकाचे काम देण्यात यावे. दररोज रोटेशन पध्दतीने कामगिरी लावण्यात यावी जेणे करुन चालक/वाहकांची तक्रार होणार नाही, संचारबंदी कालावधीत चालविण्यात येणाऱ्या फेऱ्या प्रवासी प्रतिसाद पाहूनच चालविण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!