औरंगाबाद : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी बस सेवा हळूहळू रुळावर येत आहे. शहरात रविवार पर्यंत एकोणावीस सिटी बस रस्त्यावर धावत होत्या. आता सोमवारपासून आणखी तेरा बस रस्त्यावर उतरणार आहेत. आजपासून एकूण शंभर पैकी ३२ बस १२ मार्गांवर धावणार आहेत.
फेब्रुवारी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक उसळी मारली. मार्च महिन्यात तर जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा ताण वाढला. दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येण्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ब्रेक लागला. सध्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
या पार्श्वभूमीवर ७ जूनपासून औरंगाबाद पूर्णत: अनलॉक करण्यात आले आहे. ८ जूनपासून स्मार्ट सिटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी १६ बसेस पाच मार्गांवर धावल्या. त्यानंतर हळूहळू बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात ३२ हजारहून अधिक औरंगाबादकरांनी स्मार्ट सिटी बससेवेचा लाभ घेतला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात दोन वर्षांपासून सिटीबस सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या आधी १०० बस रस्त्यांवर धावत होत्या. गतवर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर ही सेवा बंद पडली होती. आता दुसरी लाट ओसरल्यावर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला १९ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सोमवारपासून आणखी १३ बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून बारा मार्गांवर ४४४ फेऱ्या होणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तहसीलदारांवर कारवाईसाठी खंडपीठात याचिका
- मराठी अभिनेत्रीचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर योगा
- महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही – नवाब मलिक
- बेरोजगार, गरीब आणि मूक बधिर असणाऱ्या हजारो लोकांचं ‘असं’ केले जात आहे धर्मांतर
- सावधान! अजिंठा लेणी तिकीटघराजवळ आढळला बिबट्या, शेजारील कुंडातील पाणी पिण्यासाठी आल्याचा संशय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
