Share

पुढील आठवड्यापासून औरंगाबाद मनपा करणार बेघर, भिकाऱ्यांचे लसीकरण

Published On: 

औरंगाबाद : शहरातील कोरोना प्रतिबंधासाठी शहरातील बेघर, भिकारी, निराश्रित लोकांचे पुढील आठवड्यापासून लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पुढील आठवड्यापासून पालिकेची पथके रस्त्यावर उतरणार आहेत. यासाठी पोर्टलवर स्वतंत्र वेबसाईट तयार करुन त्या माध्यमातून या सर्वांची नोंदणीही केली जाणार आहे, हे विशेष.

शहरात १६ जानेवारीपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. गतवर्षी कोरोनावर ठोस औषध उपलब्ध नव्हते. पण आता लस उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला जाऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. कोरोना लसीकरण करताना शासन निर्देशांनुसार आधार कार्डचा क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बेघर व्यक्ती, भिकारी, रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसते. त्यांना कोविन अ‍ॅपवर जाऊन नोंदणी करता येत नाही.

त्यामुळे लसीकरणापासून ते सुटण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुढील आठवड्यापासून अशा व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एक स्वतंत्र पोर्टल साईट तयार करुन त्या माध्यमातून बेघर व्यक्ती, भिकारी, रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पथके तयार केली जाणार असून ही पथके रस्त्यावर उतरुन ज्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही, अशा सर्वांचे लसीकरण करेल. बेघर व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!