मुंबई – मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.यावर मार्ग काढत आणि मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता. तसा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, आता आधीचा निर्णय मागे घेत मराठा समाजाला EWS आरक्षण लागू करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारने हा प्रयत्न केला आहे.
ईडब्ल्यूएस अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना एसईबीसीचा लाभ घेता येणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, काही मराठा संघटनांनी राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसारच राज्यसरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- कोरोना नियमांची पायमल्ली करत आमदार महेश लांडगेंचा डान्स, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

