🕒 1 min read
मुंबई : मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतरच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमात संबोधित करताना अजित पवार यांनी वाढत्या इंधन दरावरून मोदी सरकारला चिमटा काढला आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली असल्याचे अजित पवार म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे हे दर कमी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा, अशी विनंती पवार यांनी केली. कोरोना काळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सामन्यांच्या खिशावर पेट्रोलच्या दरवाढीमुळे अधिक ताण वाढत आहे.
यासोबतच, ‘पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र काही कराणाने पंतप्रधानांचा इकडचा दौरा रद्द झाला, याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची काही मागणी नसताना देखील तात्काळ त्यांनी १ हजार कोटी जाहीर केले. महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवे, त्यातही आम्ही समाधानी होऊ. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी. तुम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटा आणि महाराष्ट्राला मदत मिळवून द्या,’ अशी विनंती देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणावेळी रामदास आठवले यांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला’
- पुणेकरांना मोठा दिलासा; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून खाली ! लवकरच ‘हे’ नियम लागू होणार
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- …म्हणून फडणवीस शरद पवारांच्या भेटीला गेले असावेत; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाष्य
- ‘माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
