मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न केल्याची बातमी देऊन चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडकर यांनी जुलै मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाची परिस्थीती पाहता दोघांनी दोन महिने आधीच ७ मे रोजी दुबईत लग्न करुन सुखद धक्का दिला. सोनालीने तिच्या वाढदिवशी ही आनंदाची बातमी शेअर केली होती.
आनंदात असणारी अभिनेत्री सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या राहत्या घरी अज्ञाताने घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. सोनाली कुलकर्णी यांच्या घरी वडिलांवर अज्ञाताने हल्ला केला असून या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास अज्ञात सोनालीच्या घरात शिरला त्यावेळी घरी सोनालीचे आई वडील होते. चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनाली यांच्या वडिलांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने त्यांच्यावर वार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हेगारांना काही घटनास्थळी दाखल झाले. आणि आरोपीला ताब्यात घेतले. चोरी करायला आलेल्या आरोपीचे नाव अजय शेगटे आहे.त्याला आता ताब्यात घेतले असून. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

