Share

आयर्लंडमध्ये ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते बुमराहला आदर्श

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे चाहते भारतभर आहेत. विरोधी संघाच्या फलंदाजाची दांडी गुल करण्यासाठी प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराह ओळखला जातो. काही दिवसापुर्वी आयर्लंडमध्ये देखील बुमराहचे चाहते आहेत अशी माहिती समोर आली आहे.

आयर्लंडमध्ये बुमराहचा चाहता दुसरा कुणी नसुन आयर्लंड महिला क्रिकेट संघाची खेळाडू ओर्ला प्रेंडरगास्ट ही आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने जसप्रीत बुमराह हा तिचा सर्वात आवडता क्रिकेटपटु आहे. क्रिकेटमध्ये मी बुमराहलाच माझा आदर्श मानते असे ओर्ला म्हणाली. ओर्ला ही देखील एक वेगवान गोलंदाज आहे. ती उजव्या हाताने गोलंदाजी करत असते. ओर्लाने आयर्लंडकडू ८ टी-२० सामने खेळताना ८ गडी बाद केले आहेत. २०१९ मध्ये नेदरलॅंड विरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

जसप्रीत बुमराने २०१६ मध्ये पदार्पण केले होते. यानंतर काही काळातच तो भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये बुमराह मुंबई इंडियन्स कडुन खेळत असतो. सुरुवातीच्या काळात केवळ टी-२० स्पेशलिस्ट म्हणून नावारुपाला आलेला बुमराह हळुहळु क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. काही महिन्यापुर्वी त्याने संजना गणेशन सोबत लग्न केले आहे. आता भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या दौऱ्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!