मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीची आज ४४ वी वार्षिक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्स काय घोषणा करणार याकडं संबंध देशासह जागतिक बाजारपेठेचं देखील लक्ष लागलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या असून सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरले आहेत ते ५ जी नेटवर्क आणि गुगलच्या सोबत मिळून जिओचा सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
नवा स्वस्त ५ जी स्मार्टफोन घोषित करण्यासह मुकेश अंबानी यांनी ग्रामीण बागांतून २ जी हद्दपार करून ५ जी सेवा निर्धार केला आहे. ‘ग्रामीण भागांना २-जीपासून मुक्त करण्यासाठी अल्ट्रा किफायतशीर फोनची आवश्यकता आहे. मागील वर्षी मी गुगलच्या सुंदर पिचाई यांच्याशी या विषयावर बोललो. त्यानंतर कंपनीने यासंदर्भात पावलं उचलली. जिओच्या ५ जी फोनचे नाव जिओ फोन नेक्स्ट असे असेल,’ अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
सर्वात स्वस्त स्मार्टफोन नेमका कधी येणार ?
गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल असा दावा जिओने केला आहे. १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल. सध्या या फोनची नेमकी किंमत मात्र गुपितच ठेवण्यात आली आहे. साधारण ५ हजारांच्या आसपास या स्मार्टफोनची किंमत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला; सत्ताधारी आणि विरोधकांपैकी नेमकं खोटं कोण बोलतंय ?
- फडणवीसांनी महाबिघाडी सरकारचा पोस्टमोर्टमच केलाय; भाजप नेत्याची जहरी टीका
- महाविकास आघाडीतील बिघाडी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तलवार म्यान केली ?
- वट पौर्णिमा विशेष! चिंचवनचे ३५० वर्षे पुरातन व महाकाय वटवृक्ष लवकरच होणार ‘राज्य वारसा वृक्ष’!
- प्रसेनजीत पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?


