औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे वृक्ष वैभव म्हणून चिंचवनचे २ एकर आकाराचे व ३५० हुन अधिक वयाचे पुरातन वटवृक्ष ओळखले जाते. दोन वर्षांपासून सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान ही संस्था याच्या संवर्धनासाठी जनजागृती करत आहे. ग्रामस्थांना या झाडाची महती पूर्ण समजली आहे. या झाडाची वारसा वृक्ष म्हणून राजदरबारी नोंद व्हावी म्हणून संस्थेचे डॉ. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतने ठराव पारीत करून शासन दरबारी राज्य वारसा वृक्ष समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच याची ‘हेरीटेज ट्री’ अशी नोंद होणार आहे.
वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमींनी येथे श्रमदान करून वडाची रोपे लावण्याचा शतकी उपक्रम राबविला. आता हा वारसा पुन्हा वृद्धिंगत होऊन पूर्ण १० एकर जमिनीवर वडाचे झाडे लावण्याचा व या तीर्थक्षेत्रास भरीव निधी देण्याचा मानस जि. प. सदस्य अशोक गरुड यांनी व्यक्त केला. मुर्डेश्वर संस्थानचे ओंकारगिरी महाराज, अशोक गरुड, ह. भ. प. मनोज महाराज, प. स.सभापती कल्पना व डॉ. संजय जामकर, वडाच्या झाडास आयुष्य समर्पित केलेले कळमसरे येथील वृक्षमित्र दत्ता पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
औरंगाबाद येथील निसर्ग सेवा फाऊंडेशन या संस्थेनेही येथे मोठ्या संख्येत झाडे लावली. विशेष म्हणजे यावेळी मराठवाड्यात पहिले अत्यंत दुर्मिळ असलेले “कृष्णवड” लावण्यात आले. झाडाचे संवर्धन व वृद्धी व्हावी म्हणून मान्यवरांच्या हस्ते मूठभर सेंद्रिय खत झाडाच्या अवतीभवती टाकून संगोपनाचा संदेश देण्यात आला. यावेळी गावातील तरुणांचा सहभाग उल्लेखनीय होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मनातून काँग्रेस जात नाही, भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक – नाना पटोले
- जिओचा आता सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ‘या’ तारखेला येणार बाजारात !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी
- औरंगाबादेत सकाळी ७ वाजेपासून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
- ‘अरे तुमच्यात हिंमत नसेल तर सांगा, मी चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
