Share

फडणवीसांनी महाबिघाडी सरकारचा पोस्टमोर्टमच केलाय; भाजप नेत्याची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कोरोना काळातील आकड्यांची लपवाछपवी, भ्रष्टाचार, अपुरी मदत, मंत्र्यांमधला समन्वयाचा अभाव, आरक्षणाचा वाढता गुंता आदी मुद्द्यांवर भाष्य करताना फडणवीसांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या या भाषणानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. ‘भाजप प्रदेश कार्य समिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस यांनी महाबिघाडी सरकारची पिसं काढलीत. आरोग्य क्षेत्रातल्या अपयशापासून आरक्षणाबाबतच्या घोळापर्यंत त्यांनी ठाकरे सरकारच्या एकेक घोडचुकांचे पोस्टमॉर्टेमच केलेय. महागोंधळी_सरकार,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!