Share

औरंगाबादेत पाच वर्षांखालील बालकांना न्यूमोकोकल लस मोफत!  मनपाचा सकारात्मक पुढाकार

Published On: 

औरंगाबाद : शहरात महापालिकेतर्फे पाच वर्षांखालील बालकांना न्यूमोकोकल कॉनज्युगेट लस निशुल्क दिली जात आहे. या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पाच वर्षांखालील बालकांना लस देण्यात आली. एन-११ येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, लसीकरण अधिकारी डॉ. स्मिता नळगीरकर यांच्या हस्ते वैशाली पाटील यांचा दीड महिन्याचा बालकाला लसीचा पहिला डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

५ वर्षांखालील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमुख कारण स्ट्रेप्टोकोकस हे जिवाणू असते. दरवर्षी न्यूमोनिया या आजारामुळे जवळपास १५.९ टक्के बालमृत्यू होतात. ९ % पेक्षा जास्त मृत्यू हे मेंदूज्वर मुळे होतात. या आजारापासून संरक्षण होण्याच्या हेतूने महाराष्ट्रात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत पीसीव्ही या नवीन लसीकरणाची सुरुवात करण्यात येत आहे. न्यूमोकोकल कॉनज्युगेट ही लस दिल्यामुळे न्यूमोनिया, मेनिजायटीस, ओटायसिस व सायनुसायटीस, बॅक्टेरिया, स्पेसिस या आजारापासून सं यक गडरक्षण होते.

न्यूमोकोकल कॉनज्युगेट ही लस खाजगी रुग्णालयात ३ ते ५ हजार रुपये शुल्क आकारून देण्यात येते. परंतु हीच लस महानगरपालिकेच्या वतीने अगदी निशुल्क देण्यात येणार आहे. नियमित लसीकरणाअंतर्गत बीसीजी, पेंटा, आयपीव्ही, ओरल पोलिओ, गोवर रुबेला या सर्व लसी निशुल्क देण्यात येतात. त्याच लसी खाजगी रुग्णालयात देण्यासाठी अंदाजे ५ ते १० हजार रुपये खर्च येतो. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या बालकांचे न्यूमोकोकल कॉनज्युगेट लसीकरण करून त्यांचे न्यूमोनिया या आजारापासून संरक्षण करावे. यावेळी वैद्यकीय अधिकारी तथा बालरोगतज्ञ डॉ. रवी सावरे, प्रीती सोनवणे यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!