Share

फक्त १२ हजार लसींचा साठा, दुसरा डोस घेणाऱ्यांना औरंगाबाद पालिकेचे प्राधान्य!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेने लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा मंगळवारी (दि.१३) पूर्ण केला. मात्र शहरात वारंवार निर्माण होणाऱ्या तुटवड्यामुळे एकुण लोकसंख्येच्या ७० टक्के नागरिकांचे लसीकरण कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी (दि.१५) रात्री उशीरा मनपास १२ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आज शहरातील ३४ केंद्रांवर केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर पाच केंद्रांवर पहिला डोस घेणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या लसीकरणाच्या क्षमतेनुसार १२ हजारांचा साठा एक दिवस पुरेल त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवेल.

सोमवारी रात्री शहरासाठी ५ हजार लसींचा साठा आला होता. मात्र मंगळवारी तो अवघ्या चारच तासात संपला त्यानंतर लसींचा साठा शिल्लक नसल्याने बुधवारी लसीकरण बंद होते. बुधवारी रात्री उशीरा मनपास १२ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आज शहरात लसीकरण सुरु असून सकाळपासून नागरिकांनी टोकन घेण्यासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने आत्तापर्यंत चार लाख ९६ हजार ४२८ नागरिकांचे लसीकरण केले होते.

त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या तीन लाख ७५ हजार ८२८ एवढी आहेत. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ लाख २० हजार ६०० एवढी आहे. महापालिकेने ११५ वॉर्डांमध्ये दररोज वीस हजार पर्यंत लसीकरण करण्याची तयारी केली आहे. मात्र कमी लसी मिळत असल्याने महापालिकेचा नाईलाज होत आहे. आजच्या दिवस लसीकरण चालेल त्यानंतर पुन्हा लसींची प्रतीक्षा करावी लागेल. येत्या काही दिवसात लसीकरण सुरळीतपणे सुरु होईल अशी शक्यता मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांवर लसींसाठी ताटकळण्याची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!