Share

गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतानाचे नाव देण्यास भाजपचा विरोध

Published On: 

 मुंबई – गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रद्द करण्याची भाजपची मागणी धुडकावत शिवसेना अध्यक्षांनी प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ परत पाठवित भाजपच्या प्रस्ताव नामंजुर करण्याच्या मागणीला बगल दिली. यामुळेच या उद्यानास ‘टिपु सुलतान उद्यान’ असे नाव देण्यास शिवसेनेचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल देखील भाजपकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. भाजप नगरसेवकांनी समिती अध्यक्षांना घेराव देखील घातला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात भाजप नगरसेवकांनी विरोध प्रकट केला.

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, एम /पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३६ च्या नगरसेविकेने महापालिकेच्या उद्यानास ‘टिपु सुलतान उद्यान’ असे नांव देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. सदर विषय दि.१५ जुलै २०२१  रोजीच्या बाजार व उद्यान समितीच्या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर विषय क्र. ३ च्या अनुषंगाने आला असता चर्चेवेळी  सदर प्रस्ताव कार्यक्रमपत्रिकेवर आला असता शिवसेना पक्षाच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी सदर विषयाला बगल देताना व पळ काढताना सदर उद्यानाचे काम अद्याप पुर्ण न झाल्याने हा विषय आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवावा असे आदेश दिलेत.

भाजप नगरसेवकांनी उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्यांना बोलायला दिले नाही उपसूचना मांडू दिली नाही. त्यामुळे बाजार व उद्यान समितीच्या सर्व भाजप सदस्यांनी याचा निषेध करत सभात्याग केला व त्यांनतर अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालून जाब विचारला व त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी अध्यक्षांनी सभागृहातून पळ काढला. त्यानंतर सर्व भाजपा सदस्यांनी महापौरांना भेटून कशाप्रकारे लोकशाहीची मुस्कटदाबी होत आहे व नगरसेवकांना समिती सभेत बोलू दिले जात नाही याची माहिती दिली. व टिपू सुलतान उद्यान नावाला आमचा विरोध आहे व सदर नामकरण आम्ही होऊ देणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरु असा इशाराही दिला.

प्रभाग क्रमांक १३६ येथील नगरसेविका यांनी महापालिकेच्या उद्यानास ‘टिपु सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. या नामकरणासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नामकरणाची शिफारस केलेली आहे. स्थानिक नगरसेविका यांनी वर्णन करताना प्रस्तावात टिपु सुलतान हे भारताचे क्रांती सेनानी होते. योग्य शासक, महान योद्धा, विद्वान असे त्यांचे वर्णन केलेले आहे. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केलेला होता असे सर्व म्हटलेले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभेपुर्वी अध्यक्ष – बाजार व उद्यान समिती यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले की, टिपू सुलतान उद्यान नामकरणाबाबतचा सदर प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात यावा. कारण टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदू द्वेष्टा राजा होता. टिपु सुलतान याने म्हैसूर राज्याला मुस्लिम राष्ट्र घोषित केले होते. आणि या राज्यामध्ये सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली होती. लाखो हिंदूंची हत्या / कत्तल करत असताना त्याने 40 हजार ख्रिश्चनांनाही बंदी बनवले होते. असा टिपु सूलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, अत्याचारी आणि दक्षिणेतील औरंगजेब म्हणून नावाजलेला कुशासक होता. त्यामुळे शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय ? सदर उद्यानास मौलाना आझाद, महामहीम अब्दुल कलाम, हविलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास भारतीय जनता पक्षाचा संपुर्ण पाठिंबा असेल अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

हिंदूंच्या मानबिंदूवर प्रहार व हिंदूंच्या धार्मिक आस्थेला /श्रद्धेला ठेच पोहोचवण्याची कृती करणे, धर्मांधता हे विद्ववत्तेचे लक्षण आहे काय ? असाही सवाल भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित करत  इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून, बाजीराव पेशव्यांपासून थेट झाशीच्या राणी पर्यंत सर्वांचा आपल्याला विसर पडला आहे का ? अशी विचारणा केली व या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!