बारामती : माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने खडसे राजकीय प्रवाहापासून काहीसे दूर गेले होते. ते नाराज असून भाजपमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. मात्र पक्ष नेतृत्व दखल घेईल या आशेने ते पक्षातच होते. अखेर त्यांनी काल भाजपचा राजीनामा दिला असून भाजपच्या महायुतीमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवलेंनी याआधी देखील रिपाइंमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले.
खडसेंसोबत कोणीही राष्ट्रवादीत जाणार नाही !
माझ्या संपर्कात १०-१२ आमदार असून ते भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला होता. यावर रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंसोबत इतर आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असा दावा आठवलेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पवारसाहेब उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत, त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात : संजय राऊत
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

