लखनौ:बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशा – जशा जवळ येत आहेत.तसा – तसा प्रचाराला रंग चढतो आहे.आरोप – प्रत्यारोपांना प्रचंड जोर आला आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल जमुई येथील भाजपा उमेदवार श्रेयसी सिंह यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.
त्यावेळी त्यांनी ‘राहुल गांधी आणि ओवेसी हे पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. तुम्ही या दोघांकडून देशहिताची कल्पना करू शकता का. हे दोघे देशाचं हित साधणार का. देशाचा शत्रू असलेला देश जो भारतामध्ये दहशतवादी कारवाया करतोय आणि हे त्याचे गुणगान गात आहेत यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायाची, अशा शब्दात टीका केली होती.
या टीकेला असदुद्दिन ओवैसी यांनी उत्तर दिलं आहे.योगींना प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, मी योगी आदित्यनाथ यांना आव्हान देतो की, त्यांनी २४ तासांत ते खरे योगी असल्याचे पुरावे द्यावेत. त्यांनी वैफल्यग्रस्ततेतून माझ्यावर आरोप केले आहे. मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि तिथे मी भारतीय लोकशाहीवर बोललो होतो हे त्यांना माहीत नाही का? असा सवाल देखील ओवेसींनी विचारला आहे.
एकंदरीतच आता यावर योगी आदित्यनाथ काय उत्तर देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पवारसाहेब उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत, त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात : संजय राऊत
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’


