दिल्ली: आम्ही सत्तेत आलो तर बिहार राज्यात प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत देऊ असा दावा भाजपने आपल्या बिहार विधानसभा घोषणा पत्रात केला आहे.आजच या घोषणा पत्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्याचवेळी बिहार भाजपचे दिग्गज नेते सुशीलकुमार मोदी हे कोरोना बाधित झाले आहेत.त्यांनी नुकतीच याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. बिहार मध्ये भाजप सत्तेत आल्यावर लोकांना ‘कोरोना लस’मोफत देण्यात येणार आहे.सोबतच जवळपास १० लाख रोजगार निर्मिती करून १९ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प देखील आहे.
भाजपने दिली आहेत ही महत्वाची आश्वासनं :
भाजपने बिहार निवडणुकींसाठी ‘भाजप है तो भरोसा है’ ५ सूत्रं, एक लक्ष्य, ११ संकल्प’ असा नारा दिला आहे.या पाच सुत्रांसाहित ११ मोठे संकल्प घोषित करण्यात आले आहेत.यामध्ये कोरोनाच्या लसीचं विनामुल्य वितरण,बिहारला आयटी हबच्या स्वरुपात विकसित करणार,१ कोटी महिलांना स्वावलंबी करणार,आरोग्य विभात १ लाख नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करणार,आता डाळींची खरेदीही एमएससी दरांनुसार करणार, ३० लाख लोकांना २०२२ पर्यंत पक्की घरं देणार,बिहारमध्ये दुसऱ्या एम्स २०२४ पर्यंत तयार करणार,२ वर्षांमध्ये १५ नवीन खाजगी आणि कंफेड आधारित प्रक्रिया उद्योग तयार केले जातील,पुढिल दोन वर्षांमध्ये इनलँड म्हणजेच, गोड पाण्यात माशांचं उत्पादन करणार सोबत बिहारला मासे उत्पादनात देशात क्रमांक एकला नेण्याचे सुद्धा आश्वसन आहे.१० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार हे असे ११ प्रमुख संकल्प भाजपने बिहार निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- पवारसाहेब उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत, त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात : संजय राऊत
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’


