Share

शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊ म्हणणाऱ्या मुश्रीफांची गाडी संतप्त शेतकऱ्यांनी रोखली

Published On: 

अहमदनगर : परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आज नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी मुश्रीफांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पाहणी, पंचनामे, मदत पुरेशी मिळेल का? जिल्ह्यात इतर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री केवळ दोनच ठिकाणी पाहणी करणार असल्याने इतर तालुक्यांनाही नुकसान भरपाई मिळेल का? अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात होती.

या शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!